शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे बिगुल

By admin | Published: December 30, 2016 3:01 AM

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आघाडीबाबत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही.

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आघाडीबाबत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे तूर्तास तरी काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसताना, राष्ट्रवादीने थेट उमेदवारांची यादी जाहीर केल्याने, मुंबईतील राजकीय वातावरणात तापले आहे. गुरुवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत, उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारी घोषित करण्यापूर्वी स्थानिक संसदीय मंडळात उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यात आली. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. यादीत डॉक्टर, वकील आणि उच्चशिक्षित उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण होते. मात्र, काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. उलट आघाडीची आवश्यकता नसल्याची विधाने मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी केली. त्यामुळे मुंबईत जिथे जिथे राष्ट्रवादीची ताकद तिथे सक्षम उमेदवार देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. आतापर्यंत ३४० हून अधिक जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सहा विद्यमान नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे, तसेच ज्या नगरसेवकांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला, तिथे विद्यमान नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीची मुंबईत ताकद नाही. त्यामुळे आम्हाला आघाडीची गरज नाही, असे वक्तव्य मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले होते. यावर, निरुपम यांनी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत हीच भाषा कायम ठेवावी, असे आव्हान सचिन अहिर यांनी दिले. स्वत: निवडणूक लढवायची वेळ आली की, या नेत्यांना राष्ट्रवादीची आठवण येते, असा टोलाही अहिर यांनी लगावला.राष्ट्रवादीच्या पहिल्या ४५ उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे (कंसात वॉर्ड क्रमांक)अमरनाथ काशिनाथ झा (३), कृष्णाजी भाऊराव राणे (११), अजय देसाई (१२), पूजा कुणाल मनवाचार्य (२२), किरण पुषोत्तम मोरे(२९), रुपाली अजित रावराणे (३७), रंजना सुभाष धनुका (४४), सारिका आॅस्टिन गे्रसेस (४९), सुनिता सुखदेव कारंडे (५७), रझिया उबेर सबरी(६१), मधुसूदन बी. सदडेकर (६८), बबन आर. मदने (८०), राजमणी गोमतीप्रसाद शुक्ला (८२), नेहा सुहास पाटील (९२), प्रमोद आर. गायकवाड (९५), सुरैना नीलेश मल्होत्रा (९८), मीनाक्षी सुरेश पाटील(१०४), नंदकुमार वैती (१०६), भारती धनंजय पिसाळ (१११), मनिषा तुपे (११६), सुशिला मामा मंचेकर (११७), मनिषा रहाटे(११९), चारुचंदन शर्मा(१२०), ज्योती हारुन खान(१२४), राखी हरिश्चंद्र जाधव(१३१), फरिदा शौकत(१३७), परवीन नसीम खान(१३८), राजेंद्र वामन वाघमारे(१३९), शेख नादीया मोहसीन(१४०), साजिद अब्दुल खान (१४१), सारिका संजय कांबळे(१४२), इलासबी पैगंबर मुजावर (१४३), रुपाली सचिन दाते (१४४), सिराजउद्दीन सलाउद्दीन खान (१४५), नीलेश प्रकाश भोसले (१४६), झिन्नत अजिज कुरेशी (१४७), रेखा मधुकर शिरसाट (१४८), विजय चंद्रकांत भोसले (१५४), तृप्ती अमोल मातेले (१५७), विठ्ठल विरकर(१६६), सईदा आरिफ खान(१६८), अब्दुल रशिद मलिक(१७०), जितेंद्र पांडुरंग म्हात्रे(१७८), रुनाल राजन लाड (१९३), दशरथ एस. नितनवरे (१९६).