Maharashtra Politics: “...तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे”; अजित पवारांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:13 AM2023-01-09T09:13:00+5:302023-01-09T09:13:49+5:30

Maharashtra News: जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा आम्ही विरोध केला होता, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

ncp leader ajit pawar said chief minister and prime minister should elected through voting by people | Maharashtra Politics: “...तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे”; अजित पवारांनी केली मागणी

Maharashtra Politics: “...तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे”; अजित पवारांनी केली मागणी

googlenewsNext

Maharashtra Politics: अलीकडेच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजप आणि शिंदे गट तसेच महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. शिंदे गटानेही करून दाखवत ठाकरे गटाला मागे टाकले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भूमिका मांडत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे, अशी मागणी केली. 

अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव जेव्हा विधिमंडळात मांडला, त्याला आम्ही विरोध केला होता. सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार असेल तर नगराध्यक्ष, महापौर, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानही जनतेमधून निवडण्यात यावा, अशी आमची भूमिका होती. जनतेमधून सरपंचाची थेट निवड झाल्याने बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण होतो. सरपंच आणि सदस्य वेगवेगळ्या विचारांचे असतील तर मग बघायलाच नको. यामध्ये गाव मात्र निष्कारण भरडले जाते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. 

आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची?

दुसरीकडे, राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणे, हे अतिशय चुकीचे आहे. यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढते. उद्योग बाहेर गेले, तर आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची. लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे, या शब्दांत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, एकीकडे राज्यातून मोठे प्रकल्प गेले आणि दुसरीकडे राजकीय व्यक्तीकडून अशाप्रकारचे समर्थन होते असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्माण होतील, असे अजित पवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp leader ajit pawar said chief minister and prime minister should elected through voting by people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.