शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Maharashtra Politics: “मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका; ‘भारत जोडो’त सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:32 PM

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या विधानानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलीच आक्रमक झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. यातच राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

मैं गोडसे के दौर मे गांधी के साथ हुं

अमोल मिटकरींनी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. ये किसने कहा आपसे मैं आँधी के साथ हुं? मैं गोडसे के दौर मे "गांधी" के साथ हुं ll असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. सोबत भारत जोडो यात्रेचा हॅशटॅगही लावला आहे. तसेच यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये, राहुल गांधींच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा ,"छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ यांनी घडविले"!  मात्र महाराष्ट्रात सद्य स्थिती धर्मांध विचारसरणी हे मान्य करायला तयार नाही. खोटा इतिहास पसरविणाऱ्यांची पिलावळ मोठ्या प्रमाणात वाढली त्या पिलावळी ला सणसणीत चपराक, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, संतनगरी शेगाव मधील राहुल गांधी यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले .निश्चितच हे भाषण ऐकून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला. भाजपकडून अप्रत्यक्ष पाठवलेले "काळे झेंडे" सुद्धा या भाषणामुळे इतिहास जमा झाले, असा टोला अमोल मिटकरींनी लगावला. 

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAmol Mitkariअमोल मिटकरीRahul Gandhiराहुल गांधी