शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maharashtra Politics: “राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 4:44 PM

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आला असून, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी सातत्याने विरोधकांवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत आहेत. भाजप, शिंदे गट तसेच मनसेवरही अमोल मिटकरी शेलक्या शब्दांत निशाणा साधत असतात. अशातच आता अमोल मिटकरींना धमकी मिळाल्याचे सांगितले जात आहे. राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार, अशी धमकी व्हाट्सअपवरून मिळाली आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये, मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली. राज्यातील जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिविल लाईन पो. स्टेशन अकोला या ठिकाणी तक्रार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस तात्काळ अटक करावी हि विनंती, अशी मागणी अमोल मिटकरींनी यांनी ट्विटरवरून केली आहे. सोबत तक्रार दाखल केल्याचा फोटोही शेअर केला आहे. यात मुख्यमंत्री कार्यालय आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे. 

पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली

याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ठार मारण्याची धमकी व इशाऱ्याचा संदेश प्राप्त झाला असून मला व माझ्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन सदर अज्ञात इसमावर तात्काळ कारवाई करून अटक करावी, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.  दुसरीकडे, रामनवमीच्या दिवशी अमोल मिटकरींनी ट्विटरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला होता. 

तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले

अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदूजननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात , हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीRaj Thackerayराज ठाकरे