शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जयंत पाटील म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार,” संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,“आधी…”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 6:02 PM

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काही जण इच्छुक असल्याचं समोर आलंय. दरम्यान, अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशा आशयाचे बॅनरही झळकले होते. 

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं होतं. महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असं विधान त्यांनी केलं. यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून यावर प्रतिक्रियाही येतक आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“सत्ता येईल, मग महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यानंतर नक्कीच मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल. त्या विषयी दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तोदेखील महाविकास आघाडीचा निर्णय होता. अशाप्रकारचे निर्णय भविष्यात घेण्यात येतील” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

काय म्हणाले होते पाटील?“मला समाधान या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे जवळपास सर्वांनीच मान्य केलंय. एवढ्या वेगानं आमचा पक्ष पुढे जातोय. म्हणून मला खात्री आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भविष्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल,” असं जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSanjay Rautसंजय राऊत