शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

"भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे? हे विचार करण्यासारखं" 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 4:43 PM

NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही. तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

मुंबई : आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने सुरू केलं असून भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे? हे विचार करण्यासारखं आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी केली. (NCP Leader Jayant Patil's reaction on IT Raids on Firms Linked to Ajit Pawar)

आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही. तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

आजपासून राज्यातली धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडली गेली असून सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

'अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत'धाड टाकली जाणार किंवा कारवाई केली जाणार हे भाजपाच्या नेत्यांना आधी कळतं. त्यामुळे या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत आहे, यावर आता जनतेचा विश्वास बसला आहे, असे जयंत पाटील म्हणाले. अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही दडवत नाहीत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

'लखीमपूरमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी'लखीमपूर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जालियनवाला बागेपेक्षा क्रूर कृत्य तिथे केले गेले होते. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळत आहे. भाजपाला हे सहन झाले नसेल म्हणून ही कारवाई करण्यात आली असेल, असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस