सध्या राज्याचे पावसाळी अधिवेश सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतील श्लोकांच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि संविधानाच्या मुद्द्यावरून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे. "मनुस्मृतीतील चार श्लोक विचाराधीन होते, असे अजित पवार म्हणत असतील, तर मी त्यांचा धिक्कार करतो." तसेच, "संविधानाचे नाव घेऊ नका, असे म्हणणारा, या देशाचा देशद्रोही आहे... बिर्ला देशद्रोही आहेत!" असे आव्हाड यांनी म्हटले आहे. ते विधानभवनाबाहेर बोलत होते. त्यांच्या या विधानावरून आत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार म्हणाले असतील तर -यावेळी, मनुस्मृतीसंदर्भात अजित पवारांनी म्हटले आहे की, मनुस्मृतीतील चार श्लोक आम्ही घेतले नाही. विचाराधीन असताना सातत्याने टीका केली जात आहे? असे विचारले असता आव्हाड म्हणाले, विचाराधीन... कोण म्हणालं हे? अजित पवार म्हणाले असतील तर मी त्यांचा धिक्कार करतो. तुम्ही मनुस्मृतीचा विचार तरी कसा करू शकता? दुर्दैव आहे. आता नाही म्हणताहेत, कारण हे महाराष्ट्रभर गेले आहे. तुम्ही संविधान बदलणार होतात, नंतर तुम्हाला भूमिका बदलावी लागली. कारण संपूर्ण देशभरातून विरोध व्हायरला लागला. आता मनुस्मृती संदर्भात स्वतः अजित पवार म्हणणार असतील की, विचाराधीन होतं, तर मी अजित पवारांचाच धिक्कार करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
बिरला देशद्रोही - आव्हाड :संसदेच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर, जय संविधान, अशी घोषणा दिली होती. यानंतर थरूर सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते. तेवढ्यात सभापतींनी त्यांना हटकले आणि म्हणाले, संविधानाची शपथ तर घेतच आहात, ही संविधानाचीच शपथ आहे. यासंदर्भात विचारले असतता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते जितेंद्र आव्हा म्हणाले, "हेच बघा, त्यांना संविधानाबद्दल किती राग आहे? ते पार्लमेंट चालतं संविधानानुसार, ते जे पद आहे, ते संविधानातून निर्माण झाले आहे आणि संविधानाचे नाव घेऊ नका असे म्हणणारा, या देशाचा देशद्रोही आहे... बिर्ला देशद्रोही आहेत! असे आव्हाड म्हणाले.