मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आता कंगना राणौतच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कंगना राणौतवर संताप व्यक्त केला आहे. "याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते. एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते," असे म्हणत धनंजय मुंडे यांनी कंगना राणौतच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. तसेच, आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते, असे विधान कंगना राणौतने केले होते. याला उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना राणौतला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते. त्याला कंगना राणौतने ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले.
'संजय राऊत यांनी मला जाहीर धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असे धमकावले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहीर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असा सवाल कंगना राणौतने केला होता.
पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर पुन्हा हल्लाबोल मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही. आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा; कंगनाचे खुले आव्हान"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.
आणखी बातम्या...
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान
- पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल
- भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग', काँग्रेस नेत्याचा टोला
- राज्यात बदल्यांचा धंदा सुरू झालाय, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल