मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा काढली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला लागले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. (ncp leader nawab malik claimed that bjp cannot go beyond double digit in west bengal assembly election 2021)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व तृणमूल काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण वाढले आहे. तशातच सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच परिस्थिती पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजपला तीन आकडी संख्या गाठता येणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही
अन्य राज्यांच्या निवडणुकीत ज्या प्रकारे भाजप सरकार सत्ता, पैसा आणि बळाचा वापर करत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सांगत बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच आसामध्ये देखील भाजप सत्तेतून बाहेर होणार आहे. निकालानंतर ५० ची संख्या राहील. मग अमित शाह यांनी कन्याकुमारीचा किंवा पंतप्रधान मोदींनी आसाम, बंगालचा दौरा केला तरी काही फरक पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत
भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे
रांची येथील हरमू मैदानात आयोजित केलेल्या एका सभेत शरद पवार बोलत होते. बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, या शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.