केंद्र आणि ट्विटर यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून, त्याचा नवा अंक शनिवारी पाहायला मिळाला. सरकारने नोटीस बजावली असतानाच ट्विटरनेही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक भाजप व आरएसएस नेत्यांच्या ट्विटर अकाउंटची "ब्लू टीक" काहीकाळ हटवून पुन्हा बहाल केली. या प्रकरणावरून विरोधकांनी केंद्रावर टीका केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही भाजपवर निशाणा साधला आहे. 'ब्लू टीक' आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा असे सांगतानाच 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. "ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार 'ब्लू टीक' ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे," असे नवाब मलिक यांनी सांगितले. ट्विटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.राहुल गांधींनीही साधला होता निशाणा?"मोदी सरकार ब्लू टिकसाठी भांडत आहे, कोरोनाची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा" असं खोचक ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या ट्वीटसोबत Priorities हा हॅशटॅग देखील वापरला आहे. कोरोनाच्या संकटकाळात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकार मात्र ट्विटरच्या ब्लू टिकला प्राधान्य देत आहे. सोशल मीडिया कंपन्यांसाठी केलेल्या नव्या नियमांचे पालन करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देणारी अंतिम नोटीस केंद्र सरकारनेट्विटरला शनिवारी बजावली आहे.
'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 2:19 PM
Twitter Blue Tick : यापूर्वी ट्विटरनं उपराष्ट्रपती आणि सरसंघचालकांच्या ट्विटरवरील 'ब्लू टीक' काढली होती. काही वेळानं पुन्हा 'ब्लू टीक' करण्यात आली होती बहाल.
ठळक मुद्देयापूर्वी ट्विटरनं उपराष्ट्रपती आणि सरसंघचालकांच्या ट्विटरवरील 'ब्लू टीक' काढली होती. काही वेळानं पुन्हा 'ब्लू टीक' करण्यात आली होती बहाल.