शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:12 AM

जलील यांच्या आईचे काही दिवसापूर्वी निधन झाले, म्हणून टोपे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते.

मुंबई: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या ऑफरवरून राज्यात सुरू झालेल्या वादळाचे निमित्त झाले ते खासदार जलील आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या भेटीचे. जलील यांच्या आईचे काही दिवसापूर्वी निधन झाले, म्हणून टोपे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. तेव्हा एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचा निरोप आपण शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवावा, असे जलील यांनी टोपेंना सांगितले. जलील यांनी शनिवारी माध्यमांद्वारे ही बाब उघड केल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम महाविकास आघाडीसोबत असेल का, या चर्चेलादेखील ऊत आला.

एमआयएमची चर्चा घडवून आणणे हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न फसल्याने त्यांनी आता प्लॅन बी आखलेला दिसतो. या मुद्यावर शिवसेना आक्रमक होईल आणि महाविकास आघाडी तुटेल, हे त्यांचे मनसुबे दिसतात. पण त्यांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही.- चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे माजी खासदार

एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात ती दिसली. औरंगजेबासमोर गुडघे टेकणारे आमचे मित्र, आदर्श होऊच शकत नाहीत. अशा लोकांशी आमचा कोणताही संबंध येऊ शकत नाही. युती होण्याचा तर प्रश्नच नाही, या अफवा आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार राहील.  - खा. संजय राऊत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते

भाजपला रोखण्यासाठी सगळे एकत्र येताना दिसत आहेत. एमआयएमच्या प्रस्तावावर आता शिवसेना काय भूमिका घेते, ते पाहायचे. तसेही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता ‘जनाब शिवसेना’ झालेली आहे. शिवसेना अजानच्या स्पर्धा घेत आहे. अजून ते कुठपर्यंत जाणार, ते बघू. - देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते.राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांशी ज्यांची निष्ठा आहे, तेच आमच्यासोबत येऊ शकतात. भाजपचा राज्यघटनेशी संबंध केवळ शपथ घेण्यापुरताच आहे. एमआयएमचे वागणेही घटनाविरोधी अन् धार्मिक कट्टरवाद पसरविणारे असते. ते आम्हाला मान्य नाही.- बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनNCPराष्ट्रवादी काँग्रेस