मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहेत. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Rohit Pawar comments on Amruta Fadnavis new song kuni mhanale)
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. "काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!", असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. "कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी... हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्यासाठी!" असे त्यांनी ट्विट केले होते.
( 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; Amruta Fadnavis यांचं नवीन गाणं ऐकलंत का?)
व्हॅलेंटाईन डे निमित्त 'ये नयन डरे डरे' हे गाणे प्रदर्शित व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्त अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज झाले होते.'ये नयन डरे डरे' असे या नवीन गाण्याचे नाव होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवे गाणे पोस्ट केले होते.
(अमृता फडणवीसांचं Valentine गिफ्ट; ‘हे’ नवीन गाणं ऐकलंय का?)
'ट्रोलर्स'चे केले होते स्वागतअमृता फडणवीस याआधी त्यांच्या 'तिला जगू द्या', या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यावरुन अमृता फडणवीसांना अनेकांनी ट्रोल देखील केले होते. त्यावर अमृता फडणवीसांनी "मी नेहमी ट्रोलर्सचे स्वागतच करते, त्यांच्यामुळे मी काही गाणे थांबवणार नाही. माझे आणखी एक गाणे लवकरच येणार आहे", असे म्हटले होते.
(अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं... "डाव मांडते भीती", पाहा...)