पवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे."मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपाच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?," असं म्हणता रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत कदम यांच्यावर टीका केली.
'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, "आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर..."
By जयदीप दाभोळकर | Updated: January 12, 2021 18:30 IST
राम कदमांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचं प्रकार आला होता उघडकीस
'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर...
ठळक मुद्देराम कदमांनी पोलीस कर्मचाऱ्याला फोन केल्याचं झालं होतं उघडभाजपाची विचारसरणी कशी आहे हे समजत असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य