महाराष्ट्रात रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहे. मतदारसंघासह विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.