‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अंमलबजावणी बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यभरात सुरू झाली. संचारबंदीचं पालन योग्यरीतीनं व्हावं यासाठी राज्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. कोणत्याही परिस्थितीत गाफिल राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असंही ते म्हणाले होते. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनीदेखील आपलं मत व्यक्त करत नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. ""राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण आज प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्यानं नाईलाजानं हा निर्णय घेतला आहे. अन्य राज्यांतही असाच निर्णय घेतला जाईल, अशी स्थिती आहे हे ध्यानात घ्यावं. या काळात एकमेकांना सहकार्य करुयात, कोरोना विषाणूची साखळी तोडूयात," असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 12:22 IST
Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहेत निर्बंघ
Coronavirus : रोहित पवार म्हणाले, राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण...
ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहेत निर्बंधनियमांचं पालन करण्याचं पोलीस महासंचालकांचं आवाहन