मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती दिली. तसंच, या वक्तव्याविरोधात निषेधही व्यक्त केला आहे. कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना याबाबत माहिती दिली. एकीकडे हा वाद सुरू असताना आता अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, यावरून आता भारतातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“राजकीय विरोधक असले तरी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसंच आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय. हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे,” असं रोहित पवार Leader Rohit Pawar म्हणाले. या प्रकरणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.