पुणे-
अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यात दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केतकी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही केतकीचा समाचार घेतला आहे. यात पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केतकीला चोप दिल्यानंतरच माझ्या मनाला शांती मिळेल, असं वक्तव्य केलं आहे.
'...हे तर नशेबाज लोक क्षुद्र किटक, उडून जातील', संजय राऊतांचं केतकी चितळेच्या पोस्टवर भाष्य!
"मला वाटतं ती मानसिक रुग्ण आहे. आपलं वय काय आणि आपण बोलतो काय याचा जरा विचार करायला हवा. तिनं ज्या पद्धतीनं पोस्ट केली आहे. त्याच पद्धतीनं तिला प्रतिक्रिया देखील मिळत आहेत. मला वाटतं तिला आता चोप देण्याची वेळ आली आहे. कारण तिच्यावर संस्कार काही व्यवस्थित झालेले दिसत नाहीत. त्यामुळे छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं म्हणतात. त्यामुळे छडीनं चोप देणं गरजेचं आहे. तिच्या कवितेमुळे पवार साहेबांना काहीच फरक पडणार नाही. पण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते शरद पवारांना दैवत मानतात. ते शांत बसणार नाहीत. तिला घरात जाऊन चोप देऊन तिचं तोंड काळ केल्याशिवाय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनाला शांती मिळणार नाही", असं रुपाली पाटील म्हणाल्या.
“इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही,” आव्हाडांनी व्यक्त केला संताप
जशास तसं उत्तर दिलं पाहिजेसोशल मीडियावर अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची एक मानसिकताच निर्माण झाली आहे. ती काही गुन्हे दाखल करुन संपणार नाही. कारण गुन्हा दाखल अशी लोक सुधारत नाहीत. त्यांना जशास तसं उत्तर द्यावच लागतं असं माझं स्पष्ट मत आहे. मी गुन्हा दाखल करणार आहे. परंतु तरीसुद्धा मी तिला चोप देणार, कारण तिलाही थोडा त्रास झालाच पाहिजे. तेव्हाच ती वठणीवर येईल, असं रुपाली पाटील म्हणाल्या.