शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "हा निर्णय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 08:06 PM2023-05-05T20:06:10+5:302023-05-05T20:07:33+5:30

शरद पवार यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, अजित पवार यांचं आवाहन

ncp leader sharad pawar continues as party president maharashtra ajit pawar clarifies | शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "हा निर्णय..."

शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "हा निर्णय..."

googlenewsNext

"शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि अध्यक्षपदी कायम रहावे, हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्ज्वल यश संपादन करेल," असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. तसंच त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचं स्वागतही केलं.

शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केले.

अजित पवारांचा दौरा

“शरद पवार यांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. उद्या ६ तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. ७ तारखेला बारामती, ८ तारखेला कोरेगाव, सातारा, ९ तारखेला सातारा, फलटण, १० तारखेला उस्मानाबाद, लातूर, ११ तारखेला नाशिक आणि १२ तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे,” अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

Web Title: ncp leader sharad pawar continues as party president maharashtra ajit pawar clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.