माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे NCP Leader Supriya Sule यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरुंगात आहेत. आज नाही तर उद्या आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. माझं हे बोलणं रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा,” असं सुळे म्हणाल्या.
“दोन्ही केसेस मध्ये काय होतंय हे मला माहित आहे. कशाप्रकारे जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तुम्ही डेटा काढून पाहा, जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावरच धाड टाकली जात आहे. त्यांचा जागतिक विक्रम आहे. त्यांनी १०९ वेळा देशमुख कुटुंबीयांच्या घरी धाड टाकली आहे. १०८ वेळा धाड टाकताना काय केलं? १०९ व्यांदा धाड टाकावी लागली कारण त्यांना १०८ वेळा काहीच मिळालं नाही.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.