मुंबई : अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण (deepali chavan suicide case) या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा दीपाली चव्हाण होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. (ncp leader supriya sule react on deepali chavan suicide case)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दीपाली चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्यासारखी प्रशासकीय यंत्रणा देशपातळीवर नाही. परंतु, अशा घटना घडणे, अतिशय वेदनादायी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी जे काही करायला लागेल, ते आपण करू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’
दीपाली चव्हाण यांना वाचवण्यात कमी पडलो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील आहेत. ते दीपाली चव्हाण यांना न्याय देतील, असा विश्वास करत दीपाली चव्हाण यांना वाचवण्यात आपण कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. दीपाली चव्हाण यांचे कुटुंब कोणत्या मनःस्थितीतून जात असेल, याची कल्पना करवत नाही. त्यांच्या आईची काय स्थिती असेल, याचा विचारही करू शकत नाही, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली.
मन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा
चूक कोणाची आहे, त्यात मी पडत नाही. मात्र, पुरुष किंवा महिला अधिकारी कुणीही असो, त्यांना त्रास होत असेल, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपले मन मोकळे करण्यासाठी हक्काचे जागा असावी, अशी एखादी यंत्रणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उभी करावी. या संदर्भात लोकसभेतही विषय मांडला होता, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
‘‘दीपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर...’’; चित्रा वाघ कडाडल्या
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं. वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.