सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:54 PM2023-07-05T13:54:13+5:302023-07-05T13:56:40+5:30

वेगळा मार्ग का निवडला? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं...

NCP Maharashtra Political Crisis: Chhagan Bhujbal attacked leadership of Jayant Patil | सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल

सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल

googlenewsNext

NCP Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) आजचा दिवस खूप मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर आता आज राष्ट्रवादीचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे अजित पवारांचा (Ajit Pawar) गट आहे, तर दुसरीकडे शरद पवारांचा (Sharad Pawar) गट आहे. अजित पवार गटाचा वांद्रेतील एमईटी मैदानावर मेळावा सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. 

कायदे आम्हालाही कळतात, नियमबाह्य काही केले नाही, पूर्ण विचार करुनच निर्णय घेतले आहेत. सकाळी उठलो आणि निर्णय घेतला, आहे नाही, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. यासोबतच, 2014 ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटे शपथविधी का घेतला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवालही त्यांनी यावेळी केली. 

जयंत पाटलांवर टीका
यावेळी भुजबळांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या (Jayant Patil) नेतृत्वावरही टीका केली. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या, महिला अध्यक्षांच्या निवड नाही. दोन दोन चार चार महिने सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. शरद पवार यांनी सांगूनही नियुक्त्या होत नव्हत्या. युवक काँग्रेस असो की, महिला काँग्रेस, त्यांना नेतृत्व दिल्यावरच काम सुरू होतं. ही सर्व कामे थांबली होती. सांगूनही कामे होत नव्हती. 

पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे, ओबीसी समाज आवश्यक आहे, दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं. सर्व समाजाला घेऊन पक्ष जात आहे हे चित्र निर्माण व्हायला हवं होतं, ते झाले नाही, असं म्हणत भुजबळांनी थेट जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला.

पवार साहेबच आमचे विठ्ठल, पण...
भुजबळ पुढे म्हणतात, आम्ही तुरुंगात जाऊन आलो, त्यानंतर अनेकांनी आमीष दाखवले, पण तरीही शरद पवारांसोबत आम्ही एकनिष्ठ राहिलो. आता हे का झाले? साहेब आमचे विठ्ठल, पण या विठ्ठठलाला बडव्यांनी घेरले आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या. आम्ही बाहेर पडलो, ते बडव्यांमुळे. तुम्ही आवाज द्या, त्या बडव्यांना बाजूला करा आम्ही पुन्हा यायला तयार आहोत. नागालँडला परवानगी दिली मग आम्हालाही परवानगी द्या, असंही भुजबळ म्हणाले. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

 

Web Title: NCP Maharashtra Political Crisis: Chhagan Bhujbal attacked leadership of Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.