शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

NCP vs BJP: "दिपोत्सवा'च्या आडून नक्की काय चाललंय ते मुंबईकरांना माहितीये"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 5:56 PM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी साधला भाजपावर निशाणा

NCP vs BJP, Deepotsav: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज बांधणे खूपच कठीण आहे. २०१९ला युतीमध्ये निवडणुका लढून नंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापित झाले. त्यानंतर २०२२मध्ये शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत येऊन सत्तास्थापना केली. आता खरी शिवसेना नक्की उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची, यावर अजून निर्णय आलेला नाही. तशातच, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एकत्रितपणे आपला उमेदवार जिंकवून आणला. आणि त्यानंतर, काल दिवाळीच्या मुहूर्तावर दादरच्या शिवाजी पार्कवरील दिपोत्सवासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत उपस्थित राहिल्याचे दिसले. यावरून, मनसे-बाळासाहेबांची शिवसेना-भाजपा यांची महायुती होणार का, अशी चर्चा रंगली आहे. त्याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने मात्र भाजपावर टीकास्त्र सोडले.

"प्रत्येक सण-उत्सवांना राजकीय रंग देणे ही भाजपाची जुनीच रणनिती आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर नजर असल्याने भाजपाने मनसेच्या दीपोत्सवासाठी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला जात आहे. मुंबईतील मराठी माणसाचे हित नक्की कशात आहे? मुंबईकर रहिवासी मंडळी आनंदी आणि सुरक्षित आहेत का? मुंबईकरांना आरोग्य, रोजगार आणि वाहतुकीच्या काय समस्या आहेत? या साऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजपाचे लोक काहीच बोलायला तयार नाहीत. पण कालच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावून आम्ही खूप मोठं काहीतरी करून दाखवलं आहे, असा आवेश भाजपा आणत आहे. मुंबईची जनता भोळी नाही तर सूज्ञ आहे. दिवाळी व दिपोत्सवाच्या आडून नक्की काय राजकारण सुरू आहे, याची मुंबईकरांना पूर्ण कल्पना आहे", असे रोखठोक मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरपणे मांडल्यापासून ते चर्चेत आले आहेत. सुरूवातीला त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा मांडला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही राज यांनी सडकून टीका केली होती. तशातच आता दिपोत्सवासाठी राज ठाकरे-एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर असल्याने ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे की काय अशा चर्च रंगल्या आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस