शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले मिळाले, तटकरे अद्याप प्रतिक्षेत; मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त समजला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 7:37 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरु आहेत. आज पुन्हा फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले वाटप झाले आहे. 

अजित पवारांनी राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत बसवून शरद पवारांची साथ सोडली आहे. याला आता आठवडा उलटला आहे, परंतू अद्याप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप तसेच बंगले वाटप झाले नव्हते. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरु आहेत. आज पुन्हा फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले वाटप झाले आहे. 

छगन भुजबळ यांना सिद्धगड, दिलीप वळसे पाटलांना सुवर्णगड बंगला, हसन मुश्रीफ यांना क-8 विशाळगड देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांना क-6 प्रचितगड, धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुची -3 आणि अनिल पाटील यांना सुरुचि 8, संजय बनसोडे यांना सुरुचि 18 बंगला देण्यात आला आहे. मात्र, आदिती तटकरे यांना अद्याप बंगला मिळालेला नाहीय.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटपही करण्यात आले आहे. भुजबळ यांना दालन क्रमांक 201, मुश्रीफ यांना 407, वळसे पाटलांना 303 आणि बनसोडेंना 301 दालन मिळाले आहे. मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावर २०४ आणि २१२ दालन देण्यात आले आहे. आत्राम यांना 601, 602 आणि 604 दालन मिळाले आहेत. आदिती तटकरे यांना 103 क्रमांकाचे दालन मिळाले आहे. 

उद्या मंत्रिमंडळ विस्तार? राष्ट्रवादीच्या गटाला ताबडतोब मंत्रिपदे मिळाल्याने शिंदे गट नाराज झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोणते खाते कोणाला देणार यावरूनही घोडे अडले आहे. यातच आता उर्वरित १४ खात्यांचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या केला जाण्याची शक्यता आहे. राजभवनावर दोन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरु असल्याचे समजते आहे. यामध्ये सात मंत्रिपदे शिवसेनेला मिळणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष