शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

"स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का?", रोहित पवारांचा UGC अधिकाऱ्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 3:55 PM

कोरोना संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम नकार दिला आहे. परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी थेट यूजीसीच्या अधिकाऱ्यांनाच सवाल केला आहे.

मुंबई - देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोना संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम नकार दिला आहे. तरीही विद्यापीठ अनुदान आयोग मात्र परीक्षा घेण्याच्या आग्रहावर कायम आहे. कायद्यानुसार राज्य सरकारेही विद्यापीठांना परीक्षा न घेताच पदव्या देण्यास सांगू शकत नाहीत, असं आयोगाचं म्हणणं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यूजीसीवर निशाणा साधला आहे. 

परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी थेट यूजीसीच्या अधिकाऱ्यांनाच सवाल केला आहे. कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेतला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा तसेच विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 'परीक्षा' या विषयाचा एकदाचा 'निकाल' लावावा असं रोहित यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीचे ट्विट केले आहे.

"कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न #UGC च्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 'परीक्षा' या विषयाचा एकदाचा 'निकाल' लावावा." असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास देशातील २३४ विद्यापीठे तयार असून, १७७ विद्यापीठांनी मात्र परीक्षा कधी घ्यायच्या, हे अद्याप ठरविलेले नाही. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पदवी देणे योग्य होणार नाही अशी भूमिका घेऊन विद्यापीठांनी या परीक्षा घ्याव्यात असा आग्रह विद्यापीठ अनुदान आयोगाने धरला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अनिश्चतता आहे.देशातील तब्बल १७७ विद्यापीठांनी या परीक्षा घेणार का किंवा केव्हा घेणार याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यात यश! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने लगावला आनंदाचा 'सिक्सर'

CoronaVirus News : काय सांगता? मास्क लावायला विसरल्या मंत्री, भीतीने केलं असं काही...; Video व्हायरल

भयंकर! चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा हट्ट बेतला जीवावर, 7 वर्षांच्या चिमुकलीची हत्या

CoronaVirus News : त्या तिघांनी दिले पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना जीवनदान

बापरे! बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या आजी अन्..; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण

Rajasthan Political Crisis : "काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा थेरपी किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही"

CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र