मुंबई: महाविकास आघाडीचं सरकार स्थिर असून ते ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. मात्र तिन्ही पक्षातील समन्वयाचा अभाव अनेकदा दिसून आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला विचारात घेत नसल्याची तक्रार याआधी काँग्रेसनं केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं शिवसेना आणि काँग्रेसबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी अनेक नेत्यांनी शिवसेना, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.
शिवसेना आणि काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामं करत नाहीत, अशी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची तक्रार आहे. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर विशेष नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवली. तीन पक्षांचं सरकार असल्यानं सहकार्य अपेक्षित आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामं मार्गी लावत नाहीत, अशा शब्दांत आजी-माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली.किरीट सोमय्यांना मोदी सरकारकडून 'पॉवर'?; ठाकरे सरकार वि. भाजप संघर्ष पेटणार
काय म्हणाले नवाब मलिक?राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'प्रत्येक पक्ष आपल्या आमदाराला झुकतं माप देत असतो. मात्र सत्तेत असलेल्या इतर पक्षांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्न सुटेलच असं नाही. मात्र प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत,' असं मलिक म्हणाले.