मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभमीवर राज्य सरकारडून अनेक उपाययोजना सुरु आहेत. यातच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विटवरून माहिती दिली आहे.
"१ जुलै ते ४ जुलै या कालावधीमध्ये मी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्कात आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली असून ती निगेटिव्ह आली आहे." असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, "मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे," अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.
"त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालयमध्ये संपर्क करू शकता,' असे आवाहन सुद्धा अमोल कोल्हे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात ५ हजार १३४ रुग्णांची नोंद झाली असून, २२४ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख १७ हजार १२१ झाली असून, बळींचा आकडा ९ हजार २५० झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०६ टक्के झाले असून, मृत्युदर ४.२६ टक्के आहे. सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आणखी बातम्या...
खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा
"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"
CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...
हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य
"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"