शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नथुराम गोडसेंच्या भूमिकेमुळे खा. अमोल कोल्हे वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 9:25 AM

भूमिकेमुळे कोणी खलनायक होतो का?; खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

मुंबई : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत. त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे.याबद्दल ‘लोकमत’शी बोलताना कोल्हे म्हणाले, मी २०१४ ते २०१६ या कालावधीत शिवसेनेमध्ये सक्रिय होतो. नंतर तेथूनही मी दूर झालो. २०१९ मध्ये मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मधल्या काळात म्हणजे २०१७ मध्ये मी हा सिनेमा केला होता. तो सिनेमा प्रदर्शित होणार की नाही, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून होता. अचानक तो चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे मला कळाले. मी आजपर्यंत कधीही गांधी हत्येचे समर्थन केलेले नाही, तसेच नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरणही मी कधी केले नाही. मात्र, एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करायला मिळणे याचा अर्थ आपण तसे आहोत, असा होत नाही.मी जर एखाद्या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली, तर मी खऱ्या आयुष्यात खलनायक होतो का? वैचारिकदृष्ट्या आपण जी भूमिका करतो, त्याच्याशी आपण सहमत असतोच असे नाही. उद्या जर माझ्या पक्षाने या चित्रपटाला विरोध केला, तर मला त्याचे वाईट वाटणार नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्र कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही, असा जुनाच विचार मला यानिमित्ताने आठवत आहे. या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तरी त्यातील सकारात्मक गोष्ट जाणवते, ती म्हणजे खरे आयुष्य आणि चित्रपटातील आयुष्य यात सीमारेषा अधोरेखित केली पाहिजे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचार स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. विनाकारण विविध गोष्टींची गल्लत करून राजकारण करणे म्हणजेच दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. भूमिका पटत नसेल त्यांनी स्वतःची भूमिका ठामपणे मांडणारे चित्रपट काढावेत. पुस्तक लिहावे; पण विनाकारण नको ते वाद उभे करू नयेत, असे आपल्याला वाटते, असेही त्यांनी स्पष्ट केले.ही भूमिका करण्याआधी मी शरद पवार यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, मी अभिनेता म्हणून ती भूमिका स्वीकारली तेव्हा मी राष्ट्रवादी पक्षाचा सदस्यही नव्हतो.-अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNathuram Godseनथुराम गोडसे