मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असं असतानाच काही नियम शिथील करण्यात आले असून अनेक गोष्टी हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. गुरुवारी (3 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली आहे. केवळ पार्सल सेवा सुरू करण्याची परवानगी देण्याने रेस्टॉरंट उद्योग सावरणार नाही तर पूर्णपणे रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी असं म्हटलं आहे. "कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्स सेवेची मुभा देण्यात आली असली तरी यातून या उद्योगाला सावरण्यासाठी ही गोष्ट पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंटचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे" असं ट्विट केलं आहे.
"मुख्यमंत्र्यांनी या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरू करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा" असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबने सुप्रिया सुळे यांना एक निवेदन देऊन रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली होती.
कोरोनामुळे महाराष्ट्रातील रेस्टॉरंट गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसाय बंद आहे. शासनाने पार्सल देण्यास परवानगी दिली असली तरी उदरनिर्वाहासाठी ही गोष्ट पुरेशी नसल्याचं या संघटनेने म्हटलं आहे. लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट व्यवसाय डबघाईला आला असून रेस्टॉरंट चालक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक रेस्टॉरंट चालकांचा मूळ व्यवसाय रेस्टॉरंट हाच असल्याने रेस्टॉरंट चालक मानसिक तणावाखाली आहेत. व्यवसाय पूर्णपणे ठप्प असतानाही कामगारांचा पगार, जागेचं भाडं, लाइट बिल आदी गोष्टी द्याव्या लागत असल्याने रेस्टॉरंट चालकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यासोबतच रेस्टॉरंट चालकांनी काही मागण्याही केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
लय भारी! Amazon लवकरच करणार ड्रोनने डिलिव्हरी, फक्त 30 मिनिटांत सामान येणार घरी
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग
"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला"
बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण
CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार