मुंबई- राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी जमून प्रादुर्भाव आणखी वाढू नये. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत. (ncp mp supriya sule postpones all her scheduled programs for 2 weeks amid increasing corona cases)कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपण सर्वजणच योग्य ती खबरदारी घेत आहोत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सुचनेनुसार आपण आपले मतदारसंघ आणि इतर ठिकाणचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत, असे त्यांनी कळवले आहे. दरम्यानच्या काळात आपल्या मतदारसंघाशी संबंधित सर्व आढावा बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात येतील.टीकेचे बाण सोडणाऱ्या राऊतांवर स्पष्टच बोलले अजित पवार; दिला 'मोलाचा' सल्लाव्यक्तीशः भेटीसाठी आपण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपलब्ध असू, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच राज्यातील प्रत्येक नागरिकाने योग्य ती काळजी घ्यावी. योग्य सोशल डिस्टनसिंग राखण्याबरोबरच पुरेशी स्वछता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
भावाची सूचना बहिणीनं ऐकली; सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच्या सुचनेची अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 6:09 PM