शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

"भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 6:33 PM

Nawab Malik And Modi Government : मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. यावरून देखील नवाब मलिक यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील कोरोना चाचणीची संख्या वाढवली पाहिजे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यायला हवा अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. तसेच वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे देखील या बैठकीला उपस्थित होते. "राठोड हे मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते, ते शासकीय कामकाज पुढे ठेवतील. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, शरद पवार नाराज असल्याची मला माहिती नाही" असं देखील मलिक यांनी म्हटलं आहे. 

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. यावरून देखील नवाब मलिक यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार कोणतीही नावं बदलत आहेत. भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला आहे. 

शरद पवार नाराज असल्याची मला माहिती नाही -  नवाब मलिक

"नरेंद्र मोदींच्या नावाने ज्या स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे त्याचं नाव आधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने होतं. भारतरत्नाच्या नावाचा असा बदल करणं हे कुठेतरी सर्व भारतरत्नांचा अपमान केल्यासारखं आहे. हे अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे. देशातील जनता हा निर्णय सहन करणार नाही" असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच मलिक यांनी "पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही. शरद पवार नाराज असल्याची मला माहिती नाही. पोहरादेवी गडावर कोणामुळे गर्दी जमली? याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. कोरोना काळात अशाप्रकारे गर्दी जमवणं योग्य नाही, लोकांना कोणी आवाहन केले होते का? याचीही चौकशी होईल, अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील" असं देखील म्हटलं आहे. 

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rathodसंजय राठोडNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम