शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

Rohit Pawar: “बारामती पवारमुक्त, मुंबई ठाकरेमुक्त करण्याचे भाजपचे लक्ष्य, पण रोजगार, शेतकरी प्रश्नांवर मौन”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 2:27 PM

Rohit Pawar: बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का, यावर उत्तर देताना राष्ट्रवादीने भाजपला सूचक इशारा दिला आहे.

Rohit Pawar: एकीकडे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, दुसरीकडे राज्यातील महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीवरही भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह स्थानिक पातळीवरील नेतेही कामाला लागले आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपही होऊ लागले आहेत. यात आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार तथा शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही उडी घेत, भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

भाजपचे सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला होता. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे मोठे नेते आहेत. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. शरद पवारांनी नादी लागू नये, या शब्दांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. अजित पवारांनंतर आता रोहित पवार यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपच्या वर्मावर बोट ठेवले आहे.  बारामती पवारमुक्त, मुंबई ठाकरेमुक्त करण्याचे भाजपचे लक्ष्य

आताच्या घडीला बारामती पवारमुक्त करायची. मुंबई ठाकरेमुक्त करायची, या दोन विषयांवर भाजपाचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या बातम्या होणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. मात्र, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, असे रोहित पवार म्हणाले. 

बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का?

आधी चंद्रशेखर बावनकुळे, मग देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीही बारामतीत येणार आहेत. भाजपच्या दाव्याप्रमाणे बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का? यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवे, असे रोहित पवार म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

दरम्यान, बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही. त्यापेक्षा भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. गेल्या वेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. मतदारसंघातून दरवेळी लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला. मी रोज सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतो. माझ्या मतदारसंघात लाखाच्या मताधिक्याने विजयी झालो आहे. आपली ताकद मोठी आहे, असे म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण