राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नावाने एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेला रोहित पवार यांनी विरोध केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनच याबाबत माहिती दिली आहे. तसेच 'मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
तरुणांमध्ये रोहित पवार यांची क्रेझ आहे. सोशल मीडियावरही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच काही तरुणांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या नावे अराजकीय संघटना स्थापन केली आहे. मात्र रोहित यांनी याची गंभीर दखल घेऊन तरुणांना आपण राष्ट्रवादीचे आमदार असल्याची जाणीव करून दिली आहे. तसेच मंगळवारी (1 सप्टेंबर) ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
"माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की, मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 'रोहित पवार युवा ब्रिगेड' नावाची अराजकीय संघटना स्थापन केल्याची माहिती मिळत आहे. पवार यांची कोणतीही परवानगी न घेता ही संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेनं कार्यही सुरू केलं आहे. मात्र याबाबत जेव्हा रोहित पवार यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नसल्याचं म्हणत कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे आमदार असल्याची जाणीव करून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण
CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले...
भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?
CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी