शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Maha Vikas Aghadi: “गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:25 PM

Maha Vikas Aghadi: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आक्रमक पवित्रा घेत, मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने केली. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले असले तरी यापुढे आक्रमक आंदोलन करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत आहेत. यातच आता महात्मा गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच आक्रमक मार्गानेही लढावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे. 

रोहित पवार यांनी काही ट्विट्स कर महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भात रोखठोक मत मांडले आहे. तसेच महात्मा गांधींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखी आक्रमकताही दाखवावी लागेल, असे म्हटले आहे. यावेळी रोहित पवार यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच मायावती यांच्या ट्विटचा एक फोटोही दिला आहे. 

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत

बिहारच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत पुन्हा उकरून काढण्यात येईल आणि जाहीरनाम्यातही असू शकेल. परंतु हे राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेश निवडणुकीत ध्रुवीकरणाचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसल्याने होणारी पिछेहाट स्पष्ट दिसतेय. परिणामी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचे राजकारण करून उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा. आरोप करून रान उठवायचे, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचे, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावे लागेल, असे रोहित पवार यांनी आपल्या पुढील दोन ट्विट्समध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीने मलिक यांना अटक केली आहे. ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचा आरोप करून महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असून, त्यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRohit Pawarरोहित पवारnawab malikनवाब मलिकCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण