Rohit Pawar : Video - "राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतलंय, लवकरच साहेबांच्याबाबत असंच चित्र दिसेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 12:57 PM2023-07-06T12:57:03+5:302023-07-06T13:03:38+5:30

NCP Rohit Pawar And Rahul Gandhi : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तेलंगणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

NCP Rohit Pawar Share Congress Rahul Gandhi Video and says about Sharad Pawar | Rohit Pawar : Video - "राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतलंय, लवकरच साहेबांच्याबाबत असंच चित्र दिसेल"

Rohit Pawar : Video - "राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतलंय, लवकरच साहेबांच्याबाबत असंच चित्र दिसेल"

googlenewsNext

अजित पवार यांनी केलेलं बंड आणि त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला आमदार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानं शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्हावर कब्जा करण्यासाठीचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांना आपल्याकडे वळवण्याबरोबरच पक्षाचं नाव आणि चिन्ह राखण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर कब्जा करण्यासाठी मजबूत दावेदारी केली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तेलंगणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच शरद पवारांना देखील असाच लोकांचा प्रतिसाद मिळेल असं म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "लोकांनी निवडणूक हातात घेणं म्हणजे काय याची ही झलक आहे... BRS पक्ष महाराष्ट्राकडे लक्ष देत असताना त्यांच्या स्वत:च्या तेलंगणा राज्यात मात्र लोकांनी राहुल जी गांधी यांना अक्षरशः डोक्यावर घेतलंय.... आणि लवकरच महाराष्ट्रात साहेबांच्याबाबतही असंच चित्र दिसेल..." असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. "मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो!"

"अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली"

"प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी? आणि का_पत्करली_गुलामी? हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. 
 

Web Title: NCP Rohit Pawar Share Congress Rahul Gandhi Video and says about Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.