मुंबई- सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतर आता मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. रोहित यांनी शुक्रवारी (11 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये" असं रोहीत यांनी म्हटलं आहे. "मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं 10% आरक्षण हे दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडं सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी #MVA सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे" असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
"अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल असा विश्वास"
"सरकारही पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मी पाहतोय. तसंच आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटना पीठाकडं पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये" असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 'काही मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्या जात आहेत. चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहे. समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असून त्यापासून समाजाने सावध राहावे' असं आवाहन मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न हाणून पाडा; अशोक चव्हाण यांचे आवाहन
अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम आहे आणि त्यासंदर्भात राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये व कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. काही मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्या जात आहेत. चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहे. मराठा समाजाने संतापून कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय वापर करता यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची चुकीची प्रतिमा निर्माण करता यावी, या हेतूने हे कारस्थान केलं जात आहे. समाजाने हे षडयंत्र ओळखण्याची व हाणून पाडण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका
केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली होती. "कोरोना, बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत राहा, आम्ही तुला सुरक्षा पुरवू', अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येतेय. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा" असं ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार
"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल
CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा