शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

Rohit Pawar :"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 6:16 PM

NCP Rohit Pawar : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजीगुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. परंतु आता यावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का?" असा सवाल विचारला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी @AnilAgarwal_Ved साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरातच्या निवडणुका बघता पंतप्रधान साहेबांचं प्राधान्य नेहमीप्रमाणे गुजरात असेल यात काही शंका नाही, पण त्यासाठी दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का?" असं म्हटलं आहे. 

"याप्रकरणी महाराष्ट्राचे नेते कमी पडले किंवा चुकले हे कोणीही नाकारू शकत नाही. IFSC बाबतही असंच घडलं होतं. किमान आता तरी गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. महाराष्ट्रातील युवा रोजगाराकडं डोळे लावून बसले असताना एवढी उदारता आपल्याला परवडणारी नाही" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

"लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले"

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. "वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे" असा खोचक टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारFoxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डील