मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. प्रविण दरेकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प्रवीण दरेकरांना (BJP Pravin Darekar) महाराष्ट्र द्वेषाने पछाडले आहे, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे. (ncp rupali chakankar criticise pravin darekar over corona situation politics)
उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे. कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेले Ventilators, Oxygen, Remdesivir, Vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? असे म्हणत दरेकरांनी टीकास्त्र सोडले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय?”; भाजपचा थेट सवाल
प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं आहे
एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत, आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये, अशी टीका चाकणकर यांनी करत अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय. नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे, ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो, असा टोला चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.
मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी
केंद्रीय पद्धतीने बेडचे वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे, मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचे अभिनंदन, असे ट्विट अमिताभ कांत यांनी केले आहे.
“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या सोमवारी राज्यात ४८,६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत रविवारी २,४०३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला.