शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:15 AM

Nilesh Lanke: लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे.

Nilesh Lanke: लोकसभेच्या काही टप्प्यांचे मतदान होणे अद्याप बाकी आहे. २० मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाले. आता ४ जून रोजी संपूर्ण देशभरात एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे. जनतेचा कौल कोणाला आहे, हे कळणार आहे. तोपर्यंत ईव्हीएम मशीन कडेकोट सुरक्षा यंत्रणेत ठेवण्यात आली आहेत. परंतु, काही ठिकाणी ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली आहे, तेथी सुरक्षा व्यवस्था योग्य नसल्याचे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून, ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता. तब्बल अर्धा तास हे सीसीटीव्ही फुटेज दिसत नव्हते. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार  गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, काहीवेळानंतर हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मॉनिटरवर दिसू लागले होते. मात्र, या अर्धा तासात कोणीही स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करु शकतो, असा आरोप विरोधकांनी केला होता. यानंतर आता निलेश लंके यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अज्ञात इसमाचा वावर असल्याचा दावा केला आहे.

त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही?

निलेश लंके यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये, संरक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आला. आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खात आहे. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असे निलेश लंके यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, ईव्हीएम यंत्रांच्या सुरक्षेविषयी विरोधकांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. तसेच महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झाले आहे. निकाल लागेपर्यंत ईव्हीएम मशीन्स या एका गोदामात ठेवल्या जातात. ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी तसेच स्ट्राँग रुमला कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :nilesh lankeनिलेश लंकेEVM Machineएव्हीएम मशीनlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४