अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, भाजपासोबत जायचे प्लॅनिंग आधीपासूनच; शरद पवार गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:46 AM2024-04-17T10:46:10+5:302024-04-17T10:46:30+5:30

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News: इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तुम्ही कितीही म्हटले तरी केंद्रात सुप्रिया सुळेच निवडून जाणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ncp sharad pawar group leader rohit pawar criticised ncp dcm ajit pawar over lok sabha election 2024 | अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, भाजपासोबत जायचे प्लॅनिंग आधीपासूनच; शरद पवार गटाची टीका

अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, भाजपासोबत जायचे प्लॅनिंग आधीपासूनच; शरद पवार गटाची टीका

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group News: इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तुम्ही काही म्हटले तरी, केंद्रात सुप्रिया सुळेच निवडून जाणार आहेत. सुनेत्रा पवार जाणार नाहीत. अजित पवारांनी शरद पवार यांना सोडले. लोकांचा त्यांच्यावरती विश्वास नाही. शरद पवार यांना सोडून तुम्ही भाजपसोबत गेलाय किती लोकांना आवडले? एका बाजूला तुम्ही म्हणता वातावरण भावनिक करू नका आणि तुम्हीच भावनिक करता, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी पुरक उमेदवारी अर्ज घेतला आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, आईने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म घेतला आहे. तो घ्यावा लागतो.  माझी आई बाहेरून आली आहे. माझ्या आईला शरद पवारांनी फॉर्म घ्यायला लावला. राजकीय दृष्टिकोनातून अजितदादा वेगळ्या दृष्टिकोनाचे झालेत. आम्ही कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करतो. दादा स्वतः एक ते दूर गेले. ही विचाराची लढाई आहे, असे रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत

आम्ही ३५ ठिकाणी निवडून येऊ असे म्हणतो आहोत आम्ही चर्चेने मार्ग काढतो. परंतु महायुतीत आदेश येतात, त्यांच्याकडे हुकुमशाही आहे. अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. २०१९ पासूनच भाजपसोबत जाण्याचे प्लॅनिंग सुरू होते. पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही, असा त्यांचा अलिखित नियम होता, असे रोहित पवार म्हणाले.
 

Web Title: ncp sharad pawar group leader rohit pawar criticised ncp dcm ajit pawar over lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.