“मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:57 PM2024-01-25T13:57:35+5:302024-01-25T14:02:04+5:30

NCP Sharad Pawar Group MP Amol Kolhe News: २०२४ ला उमेदवार कोण असणार हा प्रश्न येत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

ncp sharad pawar group mp amol kolhe said i shall be nominated once again for shirur lok sabha constituency | “मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास

“मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास

NCP Sharad Pawar Group MP Amol Kolhe News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये तर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपावरून अद्यापही निश्चिती झालेली पाहायला मिळत नाही. यातच आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघात आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ही संधी शरद पवार यांनी दिली. शिरुर लोकसभा मतदारसंघातील लोकांनी जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळे स्वतःला धन्य समजतो. तसेच पुन्हा शिरुर लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असे अमोल कोल्हे म्हणाले. तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात आता सक्रिय झालो असे म्हणता येणार नाही. कारण आधीपासूनच सक्रिय होतो. कोरोना काळातही अनेक कामांचा पाठपुरावा केला. २०२४ ला उमेदवार कोण असणार हा प्रश्न येत नाही. मी विद्यमान खासदार आहे, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

विकासकामे होत आहेत हे चांगले आहे

अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. विकासकामांचे उद्घाटन ते करणार आहेत. यामध्ये काही आव्हान म्हणून पाहण्यापेक्षा विकासकामे होत आहेत हे चांगले आहे. अजित पवार यांनी दौऱ्यानंतर काय सूचना दिल्या आहेत त्याबाबत भाष्य करता येईल. माझी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर ज्या मागण्या केल्या गेल्या होत्या त्या पूर्ण होतील, असे अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, कांद्याची निर्यातबंदी जी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला तर बरे होईल. शक्तीप्रदर्शन करणे किंवा अशा प्रकारे या गोष्टी करणे प्रत्येक पक्षाला, प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार असताना मी त्यावर आक्षेप का घेऊ, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp sharad pawar group mp amol kolhe said i shall be nominated once again for shirur lok sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.