“शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांनी शपथ घेतली”; सुप्रिया सुळेंचे अजितदादा गटावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 09:30 AM2023-11-24T09:30:28+5:302023-11-24T09:34:44+5:30

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group: प्रफुल्ल पटेलांनी सातत्याने भाजपला सहकार्य केले. आम्ही पुन्हा अपात्रतेची मागणी केली आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

ncp sharad pawar group mp supriya sule criticised ajit pawar group and praful patel over to support bjp | “शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांनी शपथ घेतली”; सुप्रिया सुळेंचे अजितदादा गटावर टीकास्त्र

“शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांनी शपथ घेतली”; सुप्रिया सुळेंचे अजितदादा गटावर टीकास्त्र

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group: लोकसभेत माझ्यासह अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने समर्थन केले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आहे. हे तुमच्या रेकॉर्डवर आहे. पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना एवढा मोठा निर्णय घेता तर अर्थात अपात्रतेची कारवाई व्हायला हवी, या मागणीचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपसोबत आमची वैचारीक लढाई आहे. प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने निर्णय घेत असतील म्हणून आम्ही त्यांना जुलै महिन्यातच अपात्र केले आहे. केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेतात तेव्हा प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने मतदानाचा निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची पुन्हा मागणी केली आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. 

प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला सहकार्य केले

जिथे महिलांवर अत्याचार झाले, लोकांची घरे जाळली गेली, अशा अनेक गोष्टी झाल्या, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. या भारतात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल, ते चुकीचे आहे. या चुकीच्या गोष्टींच्या बाजूने आम्ही मतदान करणार नाहीत. राजकारण असले तरी काही तत्वाच्या गोष्टी असतात. प्रफुल्ल पटेल यांची भूमिका पाहून आश्चर्य वाटले, दु:ख झाले की, प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला सहकार्य केले, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. 

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले हे मला माहिती नाही. राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंदना ताई, फौजिया ताई आणि प्रफुल्ल पटेल हे आहेत. जेव्हा मणिपूरवर चर्चा झाली, मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, तेव्हा मतदानाची वेळ आली, किंवा चर्चेत भाग घ्यायची वेळ आली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी भाजप, ज्यांची मणिपूरमध्ये सत्ता आहे, त्यांची बाजू घेतली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp sharad pawar group mp supriya sule criticised ajit pawar group and praful patel over to support bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.