NCP Sharad Pawar Candidate List ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर केली आहे. या यादीत २२ उमेदवारांचा समावेश असून प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवारांसमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात शरद पवारांनी माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे नरहरी झिरवळ यांच्याविरोधात सुनीता चारोस्कर यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड विधानसभेतील उमेदवारीवरूनही मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. कारण या मतदारसंघात पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार असतानाही त्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे क्षीरसागर यांच्या जागी पवारांकडून ज्योती मेटे यांना संधी दिली जाणार का, अशा चर्चा रंगत होत्या. मात्र शरद पवारांनी बीड विधानसभेसाठी पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांच्यावरच विश्वास टाकल्याचं आजच्या उमेदवार यादीतून स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत कोण-कोणत्या उमेदवारांचा समावेश?
एरंडोल -सतीश अण्णा पाटीलगंगापूर - सतीश चव्हाणशहापूर - पांडुरंग बरोरापरांडा - राहुल मोटेबीड - संदीप क्षीरसागरआर्वी - मयुरा काळेबागलाण - दीपिका चव्हाणयेवला - माणिकराव शिंदेसिन्नर - उदय सांगळेदिंडोरी - सुनीता चारोस्करनाशिक पूर्व - गणेश गीतेउल्हासनगर - ओमी कलाणीजुन्नर - सत्यशील शेरकरपिंपरी - सुलक्षणा शिलवंतखडकवासला - सचिन दोडकेपर्वती - अश्विनी कदमअकोले - अमित भांगरेअहिल्यानगर शहर - अभिषेक कळंबकरमाळशिरस - उत्तम जानकरफलटण - दीपक चव्हाणचंदगड - नंदिनी बाभुळकर- कुपेकरइचलकरंजी - मदन कारंडे