मुंबई - गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. कोरोनाची भीती मागे सारत गर्दी टाळून सर्वांनी बाप्पांचे स्वागत केले आहे. हे संकट लवकर दूर होऊ दे, तुझी सगळ्यांवर कृपा राहू दे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वच नेत्यांनी बाप्पाची पूजा केली आणि कोरोनाचे संकट दूर व्हावं अशी प्रार्थना केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाप्पाला साकडं घातलं आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावं असं म्हटलं आहे. तसेच सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
"मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे, ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!" असं पवारांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला संदेश दिला आहे. 'कोरोना विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो' अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक
CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी
'दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा', रोहित पवारांनी मोदींकडे केली मागणी