मुंबई दि. १४ ऑक्टोबर - "शिंदे -फडणवीस सरकारने आता आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामीण भागात मंजूर केलेल्या व सुचवलेल्या कामांना रद्द करण्यात येत असल्याचा शासन निर्णय १२ ऑक्टोबर रोजी काढला आहे त्यावर महेश तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
"महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास खात्यातंर्गत राज्यातील ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर विकासकामे व निधी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर करत विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिंदे सरकारमधील संबंधित खात्याचे उपसचिव कालू गोन्या वळवी यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२१ पासूनची सर्व मंजूर कामे रद्द करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. एकंदरीतच शिंदे - फडणवीस सरकार वैयक्तिक रागापोटी महाविकास आघाडीने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर टाच आणत आहे," असा आरोपही त्यांनी केला.