राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:36 PM2020-08-13T18:36:50+5:302020-08-13T18:42:42+5:30
घरवापसीच्या मुद्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र, सर्व बाबी विचारात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत बोलणी सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले होते. एवढेच नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ हे पक्षात नाराज असल्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र आता, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर मोठा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी घरवापसीवरही भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चेवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पडदा टाकला आहे. अजित पवार अथवा पार्थ पवार हे दोघेही नाराज नाहीत. यामुळे ते नाराज आहेत, असे मानण्याचा प्रश्नच येत नाही. पार्थ पवार कुठलाही निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
घरवापसीच्या मुद्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र, सर्व बाबी विचारात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत बोलणी सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
काय आहे नेमकं प्रकरण?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना आजोबा शरद पवार यांनी, 'मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही. तो अजून इमॅच्युर आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे,' असे म्हणत पार्थला नाव न घेता फटकारले होते.
यावर पार्थ पवार यांनी मला पवार साहेबांच्या वक्तव्यावर काहीच बोलायचे नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि शरद पवार यांच्या वक्तव्यावर विनाकारण मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही, असे म्हटले होते.
लंबी रेस का घोडा है...थांबू नकोस -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादावर भाष्य करत नितेश राणे यांनी, 'आज परत सांगतो..पार्थ.. लंबी रेस का घोडा है...थांबू नकोस मित्रा,' असे म्हटले आहे. तर पद्मसिंह पाटील यांचे नातू तथा भाजपा आमदार राणा जगजितसिंह यांचे पुत्र मल्हार पाटील यांनीही पार्थचे समर्थन केले आहे. 'तुम्ही जन्मत: योद्धे आहात, हे मी माझ्या बालपणापासून पाहात आलोय. मला तुमचा अभिमान आहे. आम्ही उस्मानाबादमधून आहोत... आपल्याला माहीत आहे कसे लढायचे,' अशी फेसबुक पोस्ट मल्हार पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम