शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल जाहीर: महायुतीची लाडकी बहीण जिंकली; आदिती तटकरेंचा विजय निश्चित
2
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
3
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
4
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
8
Vikhroli Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळीत पुन्हा एकदा राऊतांचीच हवा, हॅटट्रिक साधणार?; ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
9
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल
11
Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...
12
Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट...
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
14
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
15
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
16
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर
17
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
18
Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

महायुतीच्या जागावाटपाबद्दल सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले- "कुठलाही मतदारसंघ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 5:34 PM

अमित शाह यांच्याशी दोन दिवसआधीच शिंदे व अजितदादा गटासोबत केली चर्चा

Sunil Tatkare, Lok Sabha Elections 2024: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा तीव्र झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही जागावाटपाच्या मुद्द्यांवर खलबतं सुरू आहेत. भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली, त्यात महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नव्हता. त्यानंतर अमित शाह स्वत: मुंबईत चर्चेसाठी आले. अमित शाह यांनीअजित पवार, प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबद्दल आणि मतदारसंघाच्या चर्चांबद्दल महत्त्वाचे विधान केले.

मतदारसंघनिहाय जागावाटपाची चर्चा?

"मतदारसंघनिहाय जागा वाटपासंदर्भात पक्षनिहाय काहीच चर्चा झालेली नाही. या निव्वळ वावड्या आणि केवळ अफवा आहेत मात्र पुढील दोन दिवसांत मतदारसंघनिहाय एकंदरीत राजकीय चित्र नजरेसमोर ठेवून चर्चा होईल. अजून मागणी करण्याचा प्रश्नच आलेला नाही. बुधवारी प्राथमिक स्वरुपात चर्चा झाली. आम्हाला NDAमध्ये सहभागी करून घेण्यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य भूमिका बजावली होती. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून चर्चा झालेली नाही. येत्या दोन दिवसात नक्की होईल आणि अत्यंत समन्वयाने, सामंजस्याने जागा वाटप होईल व लगेचच दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल," असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार?

"जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. तो झाल्याशिवाय यावर बोलता येणार नाही. दोन दिवसांत याबाबत निर्णय पूर्ण झाल्यावर, जर बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत", अशी माहिती सुनिल तटकरे यांनी पत्रकारांना दिली.

म्हणून २०१४ला पराभव झाला!

"अनंत गीते यांनी २०१४ साली सुनिल तटकरे नावाचे अनेक उमेदवार उभे केले नसते तर त्यांना मी त्याचवेळी पराभूत केले असते. देशात कमी मताने पराभूत त्यावेळी झालो मात्र २०१९ मध्ये देशात आणि महाराष्ट्रात जबरदस्त लाट असताना फक्त पाच जागा त्यापैकी चार राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरी जागा कॉंग्रेसला मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते यांचा ३३ हजाराने पराभव केला होता. त्यावेळेचे मित्रपक्ष आज नसतील परंतु आता वेगळे मित्रपक्ष सोबत आहेत. त्यामुळे विनाकारण पोकळ दावा करत स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न अनंत गीते करत आहेत. जनतेला मी गेल्या ४० वर्षांत केलेल्या कामाची पूर्ण माहिती आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला तर माझ्या नेतृत्वाने मी उभा रहावे असे ठरवले आहे त्यामुळे अर्ज भरणार त्यावेळी आणि निकाल लागेल त्यावेळी किती मोठ्या फरकाने एकतर्फी विजय होतो ते समजेल," असा इशारा सुनिल तटकरे यांनी दिला.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपा