वर्धा: राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवले आहे. मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले असून, ईडी कार्यालयात मंगळवारी उपस्थित राहण्याचे आदेश समन्सद्वारे देण्यात आले आहे. यानंतर आता राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येण्या सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. असे कधीच पाहिले नाही. आमचेच नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. (ncp supriya sule react on ed summons anil parab in money laundering case)
राज्यातील नाइट कर्फ्यूबाबत ठाकरे सरकार विचाराधीन; राजेश टोपे यांचे मोठे संकेत
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्या संघर्षात चर्चेत आलेले मंत्री अनिल परब चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील भाजपाने अनिल परब यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ईडीने अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांच्या अटकेसाठी अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप भाजपाने केला होता. जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच ईडीने पाठवलेल्या नोटिसीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावर आता राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला
असे कधीच पाहिले नाही
आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असे कधीच पाहिले नाही. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवले जाते. ही कुठली संस्कृती आहे, अशी विचारणा करत, ते काय विचार करतात हे सांगू शकत नाही. मात्र, हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असे पाहिले नाही, हे दुर्दैवी आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा
ईडीसमोर जाऊन स्वत:ला निर्दोष सिद्ध करावे
अनिल परब यांच्या परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्र येणार नव्हते. नोटीसच येणार होती. आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.
वेगात वाढ व वेळेची बचत होणार! रेल्वे ८ हजार ट्रेनच्या वेळा बदलणार, IIT मुंबईची घेणार मदत
दरम्यान, शाब्बास! जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू.. जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.