शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Supriya Sule : शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 3:47 PM

NCP Supriya Sule Slams Ajit Pawar : अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे.

अजित पवार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी अनेक गौप्यस्फोट करतानाच अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवृत्तीवरही स्पष्टपणे बोलले. कॉर्पोरेटमध्ये, सरकारी नोकरीत निवृत्तीचं वय ५८ असतं. अधिकाऱ्यांसाठी ६० वर्षे असतं. भाजपामध्ये ७५ वर्षांनंतर निवृत्त केलं जातं. इथं ८२ झालं,  ८३ झालं,  तुम्ही निवृत्त होणार कधी? दोन मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो म्हणून सांगितलं. मग अचानक तो निर्णय मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला.

शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे. "काही लोकांचं वय झालं त्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने लढतात. देशात टाटा ग्रुप हा सर्वात मोठा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय ८६ आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे साइरस पूनावाला यांचं वय ८४, अमिताभ बच्चन 82, वॉरेन बफेट, फारूख अब्दुला साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

"श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कोणाबद्दलही बोला. महिला आहे... छोटसं बोललं तर चटकन डोळ्यात पाणी येतं पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराबाई होते आणि तीच जिजाऊ होते. लढाई एका व्यक्तीविरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधातील आहे. NCP ला काय म्हणायचे... नॅचरली करप्ट पार्टी, असं म्हटलं होतं.  देशात सर्वात करप्ट पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. सर्वांनीच हा आरोप केला आहे" असं म्हणत सुप्रिया यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसायचं तर आम्ही पोरी परवडल्या... लेक वडिलांसोबत उभी राहते. २०१९ मी विसरलेले नाहीत. आज 80 वर्षांचा योद्धा लढला. जे गेले त्यांना शुभेच्छा. गंमत अशी की त्या बॅनरवर पण शरद पवार आहेत. हा माझा महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे. भाजपाने द्वेष पसरवला, ताकदीने रस्त्यावर उतरा, भाजपाविरोधात बोलत राहू. सत्ता येते जाते. 8, 9 खुर्च्या मोकळ्या झाल्या, नवीन लोकांना संधी मिळणार आहे. पुन्हा एकदा ओरिजनल राष्ट्रवादीचा झेंडा राष्ट्रवादीकडेच राहील, राष्ट्रवादीकडे एकच शिक्का आहे त्याचं नाव शरद पवार" असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार