शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

Supriya Sule : "50 खोक्यांमुळे यांचा आराम, मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार"; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 3:01 PM

NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde : सुप्रिया सुळे य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. "माय-बाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य याचं आत्मचिंतन ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावं" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "50 खोक्यांमुळे यांचा आराम चालला आहे. पण यामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार" असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

"स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार चालवणं आणि सर्वसामान्य माय-बाप जनतेला वाऱ्यावर सोडणं हे कितपत योग्य आहे याचं आत्मचिंतन आता ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावं. माझी ईडी सरकारला विनंती आहे की तुम्ही तातडीने इलेक्शन घ्या, लोकप्रतिनिधीची महाराष्ट्राला गरज आहे. 50 खोके असल्याने याचा आराम चालला आहे पण सामान्य मराठी माणूस यामध्ये भरडला जातो. सत्तेसाठी किती तडजोड करावी याचे उत्तम उदाहरण सध्याचे सरकार आहे" असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

"लोकांचं नुकसान झालं तरी चालेल, स्वत:चं नुकसान होऊ नये असं स्वार्थी ईडी सरकार"

"सत्ता टिकली पाहिजे, हे त्यांचे धोरण आहे. सत्ता टिकावी यासाठी तडजोड करणे सुरू आहे. लोकांचं नुकसान झालं तरी चालेल पण स्वत:चं नुकसान होऊ नये असं हे स्वार्थी ईडी सरकार आहे. राष्ट्रवादी पक्ष हा संविधान मानणारा आहे. तर भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की, एक देश एक पक्ष आहे. ही एक हुकूमशाहीच म्हणावी लागेल. ही देशातील दडपशाही आहे" असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी याआधी देखील राज्यातील नव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 "राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज; एक कार्यक्रमाला जातील, दुसरे..."

"आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काहीनाकाही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी Whatsapp वर पाठवला आहे" असं म्हटलं होतं. तसेच सुप्रिया सुळे यांनी "महाराष्ट्रातलं सरकार ओरबाडून, दडपशाही करून, ईडी करून चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलं आहे. आजकाल ५० खोके, एकदम ओके हे ऐकायला मिळत... हे खूप दुर्दैवी आहे. अडीच महिने झाले आपल्या जिल्हात आणि कुठेही राज्यात पालकमंत्रीच नाही. मी गेले 15 दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय पण मला अजूनही वेळ मिळालेली नाही" असंही म्हटलं होतं. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस