शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

Supriya Sule : "तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली"; सुप्रिया सुळेंचं संभाजी भिडेंवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 11:09 AM

NCP Supriya Sule And Sambhaji Bhide : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे मंत्रालयातून बाहेर पडत असताना एका महिला पत्रकाराला भिडेंनी कुंकू लावण्याचा सल्लाही दिला. संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला परखड सल्ला दिला. 

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते, त्यावेळी एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी हातातील बूम भिडेंसमोर केला होता. त्यावेळी, संभाजी भिडेंनी आपल्या मनातील भावना अशा व्यक्त केल्या. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनीही संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे.

"तू आणि मी ....मी लावतो टिळातू लाव टिकलीपरंपरेच्या बाजारातअक्कल आम्ही विकली 

मी लावतो भस्मतू लाव कुंकूगुलामीचा शंखदोघे मिळून फुंकू

तू घाल मंगळसूत्रमी घालतो माळमनूने मारलेली रेषामनोभावे पाळ

तू घाल बांगड्यामाझ्या हातात गंडा मुकाट्याने ऐक नाहीतरआमच्या हातात दंडा

मी घालतो मोजडीतू जोडवे घालसप्तपदी च्या मर्यादेत जन्मभर चाल

तू घाल अंबाडामी  शेंडी राखतोविज्ञानाच्या प्रगतीलापरंपरेने झाकतो 

मी घालतो टोपीतू घाल बुरखाबायकांच्या गुलामीवर दोन्हीकडेएकमत आहे बर का...!!!

मी धोतरात, तू शालूतहोऊ परंपरेचे दाससाने गुरुजी ते भिडे गुरुजीमहाराष्ट्राचा प्रवास .....!!!!!

- हेरंब  कुलकर्णी"

"शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाही"

संभाजी भिडे पुढे बोलताना म्हणाले की, मी व्यक्तिगत स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. भगवंताच्या कृपेने आपल्याला चांगले मुख्यमंत्री लाभले. धाडसाने अनेक निर्णय घेतात. प्रत्येक निर्णय उत्कृष्ट घेतले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे विचार घेऊनच पुढे आले. शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाही. राम लक्ष्मण एकत्र पाहिजेत. भगवंत त्यासाठी मदत करतोय. भविष्यात सगळे एकत्र येतील असं त्यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण